उपोषणामुळे अविमुक्तेश्वरानंद यांची प्रकृती बिघडली
ज्ञानवापीमध्ये पूजा न करू दिल्याचे प्रकरण
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी ४ जून या दिवशी जाणारे द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे विशेष प्रतिनिधी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी त्यांच्या येथील श्रीविद्या मठातच रोखल्यानंतर त्यांनी उपोषण चालू केले आहे. अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे ५ जून या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मधुमेह असल्याने त्यांना त्रास होत आहे. त्यांच्या शरिरातील साखरेची पातळी ४४ वर आली आहे, अशी माहिती त्यांच्या अनुयायांनी दिली. त्यांनी मौनव्रतही धारण केले आहे.स्वामी अविमुक्तेश्वरानंद – अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे प्रकृती बिघडली
स्वामी अविमुक्तेश्वरानंद दर्शन पूजन की मांग को लेकर अपने मठ में ही अनशन पर हैं. #UttarPradesh https://t.co/IU5sDziz73
— AajTak (@aajtak) June 5, 2022
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्या साध्वी पूर्णाम्बा यांनी सांगितले की, स्वामींना स्वतःच पूजा करण्यासाठी जायची इच्छा आहे असे नाही, तर कुणीही जाऊन शिवलिंगाची पूजा चालू करावी, अशी त्यांची मागणी आहे. शिवलिंगाची पूजा करावी आणि त्याची माहिती स्वामींना देण्यात यावी. जोपर्यंत पूजा चालू होणार नाही, तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत.