खूंटी (झारखंड) जिल्ह्यात कॅथॉलिक चर्चकडून १२ मुलांचे धर्मांतर !
केंद्रीय बाल संरक्षण आयोगानेही घेतली नोंद !
रांची (झारखंड) – राज्यातील खूंटी जिल्ह्यात असलेल्या कमडा या गावातील रोमन कॅथॉलिक चर्चने मुंडा समुदायाच्या १२ आदिवासी मुलांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेचे अन्वेषण करून कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली आहे. केंद्रीय बाल संरक्षण आयोगानेही या घटनेची नोंद घेतली आहे. धर्मांतराची घटना २२ मे या दिवशीची असल्याचे सांगितले जात आहे.
झारखंड के खूँटी में मुंडा समुदाय के 12 नाबालिग बच्चों को बना दिया ईसाई, NCPCR ने लिया संज्ञान: रोमन कैथोलिक चर्च पर कार्रवाई की माँग#Jharkhand https://t.co/vHSj8ktsw6
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 5, 2022
कमडा गावचे रहिवासी रेडा मुंडा यांनी आरोप केला की, झारखंडमध्ये धर्मांतरबंदी कायदा असूनही अवैध पद्धतीने धर्मांतर केले जात आहे. धर्मांतर झालेल्या हिंदूंना त्यांच्या जातीमुळे मिळणार्या सवलती रहित करण्याची मागणी मुंडा यांनी सरकारकडे केली आहे. धर्मांतर करणार्या चर्चवरही कारवाई करण्याची मागणी गावकर्यांकडून केली जात आहे.
संपादकीय भूमिकाझारखंडमध्ये धर्मांतराबंदी कायदा असूनही कॅथॉलिक चर्च अवैधपणे हिंदु मुलांचे धर्मांतर करत आहेत. अशांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी ! |