बनावट अपंगत्वाचा दाखला दिल्याने ससूनमधील संगणक हाताळणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद !
पुणे – अपंगांना शासकीय सोयीसुविधा मिळण्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक असते. अपंगत्वाची चाचणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र दिले जाते. ससून रुग्णालयातील एच्.एम्.आय.एस्. प्रकल्प विभागातील ‘संगणक ऑपरेटर’ सचिन बाजारे यांनी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र देऊन त्या बदल्यात सांग सिंह यांच्याकडून पैसे घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. ससूनमधील प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याविषयी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या घटनेचे पुढील अन्वेषण करत आहेत.