भिवंडी येथे हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने महाराणा प्रताप जयंती साजरी !
ठाणे, ४ जून (वार्ता.) – भिवंडी येथे हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी असणारे धर्मप्रेमी श्री. दीपक गुप्ता आणि श्री. चंद्रशेखर यांनी प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. धर्मप्रेमी श्री. अशोक म्याना यांनी दीपप्रज्वलन केले. या वेळी बजरंग दलाचे पदाधिकारी श्री. श्रीधर मणचे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची पूजा केलेली पाहून रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक लोक तेथे थांबून नमस्कार करत होते.