पिंपरी (पुणे) आणि आकुर्डी येथील साधन केंद्रातील पालकांच्या गृहभेटी घेण्याचे शिक्षकांना आदेश !

प्रातिनिधिक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – महापालिका शिक्षण विभागाने यू-ट्यूबच्या माध्यमातून पिंपरी आणि आकुर्डी शहर साधन केंद्रातील महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या मुख्याध्यापक अन् शिक्षक यांना शाळापूर्व सिद्धतेसाठी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांना १९ निकष पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळा चालू होण्यापूर्वी शिक्षकांनी पालकांच्या गृहभेटी घेण्याचे आदेशही शिक्षकांना देण्यात आले आहेत.

शालेय परिसर स्वच्छ ठेवावा, वर्ग स्वच्छता आणि सजावट, संगणक विभागातील संगणक चालू स्थितीत आहेत का ? ते पहावे. शाळेतील वीजयंत्रणा, पंखे, सांडपाणी व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी सुविधा नादुरुस्त असल्यास त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात. यांसह इतरही गोष्टी पूर्ण करण्यास शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सूचना दिल्या आहेत.