जळगाव येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्या ‘महावितरण’च्या दोघांविरोधात गुन्हा नोंद !
जळगाव – येथील महावितरण आस्थापनात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कार्यालयातील व्यवस्थापक उद्धव कडवे यांनी एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. मानसिक छळ करत तिला कामावरून काढून टाकले. कार्यालयातील राजेंद्र आमोदकर यांनीही तिचा विनयभंग केला. (अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फच करायला हवे ! – संपादक) महिलेने १ जूनला या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी उद्धव कडवे आणि राजेंद्र आमोदकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही महिला असुरक्षितच ! |