कानपूर येथील दंगलीच्या प्रकरणी ३६ मुसलमानांना अटक
|
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे शुक्रवार, ३ जून या दिवशी नमाजपठणानंतर मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत ३६ मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. यात या हिंसाचाराचा प्रमुख सत्रधार हयात जफर हाश्मी याचाही समावेश आहे.
Kanpur Violence: At Least 36 Arrested As CM Yogi Directs Strict Action; Properties Of Rioters To Be Seizedhttps://t.co/A6aVW3jfct
— Swarajya (@SwarajyaMag) June 4, 2022
एकूण ४० ज्ञात, तर १ सहस्र अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. आरोपींवर ‘गुंडा कायद्या’द्वारे कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.
(सौजन्य : वनइंडिया हिंदी)
येथील बेकनगंज भागातील यतिमखाना बाजार येथे शुक्रवारच्या नमाजानंतर अनुमाने १ सहस्र मुसलमानांनी ५ घंटे दगडफेक करत, पेट्रोल बाँब फेकत, गोळीबार करत, तसेच तोडफोड करत हिंसाचार केला. या वेळी त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबारही केला. २६ मे या दिवशी भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारे विधान केल्यावरून हा हिंसाचार करण्यात आला.
संपादकीय भूमिकाश्रद्धास्थानांचा कथित अवमानाच्या कारणावरून थेट कायदा हातात घेणार्या मुसलमानांच्या विरोधात काँग्रेसी, पुरोगामी, साम्यवादी आदी कधी कारवाई करण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या ! |