रशियाने आतापर्यंत युक्रेनचे २४ सहस्र किलोमीटर रस्ते आणि ३०० पूल उद्धवस्त केले
कीव्ह/मॉस्को – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला १०१ दिवस पूर्ण झाले आहेत. रशियाने युक्रेनच्या २० टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले आहे. या रशियन सैन्याने आतापर्यंत युक्रेनमधील २४ सहस्र किलोमीटर रस्ते आणि ३०० पूल उद्धवस्त केले आहेत.
Ukraine claims 24,000 km of roads, 300 bridges destroyed by Russia’s forces https://t.co/SYiM2BkRGo
— Republic (@republic) June 3, 2022
‘कीव्ह स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या विश्लेषण विभागाच्या अहवालानुसार, या युद्धामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेची आतापर्यंत ८ बिलियन डॉलर्सहून अधिक (अनुमाने ६२ सहस्र १५५ कोटी रुपयांहून अधिक) हानी झाली आहे.