श्रीरंगपट्टण (कर्नाटक) येथे विश्व हिंदु परिषदेचे आंदोलन
जामा मशीद पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याचे प्रकरण
मंड्या (कर्नाटक) – काही आठवड्यांपूर्वी मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथे जामा मशिदीच्या नूतनीकरणाच्या वेळी हिंदु मंदिराचे अवशेष सापडले होते. यानंतर हिंदूंनी ‘तेथे पूर्वी ‘मूडला बगिलु अंजनेया स्वामी मंदिर’ होते’, असे पोलिसांना सांगून मशिदीच्या नूतनीकरणाचे काम थांबवले. तेव्हापासून ही जागा हिंदूंना मिळावी, यासाठी हिंदु संघटना प्रयत्न करत आहेत. ‘पुरातत्व विभागाने याचे सर्वेक्षण करावे’, अशीही मागणी करण्यात आली आहे. (ही मागणी पुरातत्व विभाग मान्य का करत नाही ? – संपादक) या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषदेने ४ जून या दिवशी ‘चला श्रीरंगपट्टण’ असे आवाहन करत या कथित मशिदीच्या ठिकाणी प्रवेश करून पूजा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पोलिसांनी येथे जमावबंदी लागू केली, तसेच येथे ५०० हून अधिक पोलीस नियुक्त करून ४ ठिकाणी तपासणी चौक्या उभारल्या. पोलिसांनी येथे संचलनही केले. या प्रसंगी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी येथील रस्त्यावर श्री हनुमान चालिसाचे पठण केले.
जामिया मस्जिद विवादः विहिप और बजरंग दल के ‘श्रीरंगपटना चलो’ आह्वान बाद तनाव https://t.co/i31IE7nBMI
— News Nation (@NewsNationTV) June 4, 2022
याविषयी कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी ‘पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलावीत’, असा आदेश दिला. त्यांनी म्हटले की, कोणत्याही परिस्थितीत कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. कोणत्याही संघटनेला तिचे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने करण्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.