कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात चोरून अमली पदार्थ नेणार्या कारागृह सुरक्षारक्षकाला अटक
म्हापसा, २ जून (वार्ता.) – अवैधपणे कोकेन आणि गांजा हे अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी कोलवाळ कारागृहाच्या सुरक्षारक्षकाला कोलवाळ पोलिसांनी अटक केली. सदर सुरक्षारक्षक चोरून हे अमली पदार्थ कारागृहात नेण्याच्या प्रयत्नात होता.
A security guard posted at the central prison in Colvale in north Goa was arrested on Thursday for allegedly possessing drugs to supply to an inmate.#Goa #Crimehttps://t.co/Tjk6MP9P4Y
— IndiaToday (@IndiaToday) June 3, 2022
यासंबधी कोलवाळ पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. बंदीवानांमध्ये मारहाण होणे, त्यांना भ्रमणभाष पुरवणे, अमली पदार्थ पुरवणे असे अनेक अपप्रकार सातत्याने उघड होत असतात. (कारागृहातील बंद्यांमध्ये मारहाण होणे, त्यांना भ्रमणभाष पुरवणे, अमली पदार्थ पुरवणे असे अनेक अपप्रकार उघड होतात. यावरून कारागृह पोलिसांचा कारभार ढिसाळपणे चालू आहे, हे लक्षात येते. सरकारने यासंबंधी कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे, तरच असे प्रकार थांबतील ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअमली पदार्थ नेणारे असे अनेकजण असू शकतात. अशांवर सरकारने कठोरातील कठोर कारवाई करावी ! |