फळबागेच्या कडेने वड, पिंपळ यांसारखी झाडे लावल्यास उत्पादनाला साहाय्य होते !
बागेत वड, कडुलिंब किंवा पिंपळ यांसारख्या वनस्पती असल्यास बागेतील वातावरणाच्या तापमानात २ ते ३ अंश डिग्री सेल्सियसने घट होते. बागेच्या सीमेलगत जांभूळ, कडुलिंब, करंज यांसारखी झाडे लावल्यास ती बागेला वादळवाऱ्यापासून, तसेच उष्ण वाऱ्यापासून संरक्षण देतात, तसेच वातावरणात गारवा राहून शेती उत्पादनाला साहाय्य होते. असे असले, तरी ‘मौल्यवान भूमी अशा झाडांमुळे फुकट जाते’, या चुकीच्या समजुतीने आणि विनाहंगामी उत्पादने घेण्यासाठी अशी झाडे लावण्याचा प्रयत्न क्वचितच होतो.
– श्री. मोहन बारी (‘दैनिक लोकसत्ता’, ५.६.१९९९)