भारतामध्ये लोकांवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर होणार्‍या वाढत्या आक्रमणाविषयी आम्ही चिंतीत ! – अमेरिकेचा कांगावा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन

वॉशिंग्टन (अमेरिका) – लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी अमेरिका नेहमीच उभी आहे. भारतामध्ये लोकांवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर होणार्‍या वाढत्या आक्रमणाविषयी आम्ही चिंतीत आहोत, असे फुकाचे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी केले. ते ‘जगातील धार्मिक स्वातंत्र्य’ या विषयावर आयोजित चर्चेमध्ये ते बोलत होते. ‘आशियाई देशांमध्ये विशेष करून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन या देशांमध्ये अल्पसंख्य लोक अन् महिला यांना लक्ष्य केले जात आहे. आम्ही अन्य देशांची सरकारे, बहुद्देशीय संघटना, नागरिक यांच्यासमवेत या दिशेने काम करू’, असेही ब्लिंकन या वेळी ते म्हणाले.

ब्लिंकन म्हणाले की, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सिद्धांतांच्या विरोधात जे आहेत, त्या धर्माच्या लोकांना चीन त्रास देत आहे. तेथे बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या धार्मिक स्थळांना नष्ट केले जात आहे. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना रोजगारामध्ये बाधा निर्माण केली जात आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिका सातत्याने भारताच्या अंतर्गत विषयावर विधाने करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी भारताने अमेरिकेला योग्य शब्दांत समज दिल्यानंतरही अमेरिकेची शेपूट जर वाकडीच रहात असेल, तर भारताने जागतिक व्यासपिठावर अमेरिकेतील वर्णद्वेषाविषयी बोलायला चालू केले पाहिजे आणि या संदर्भात एखादा अहवालही प्रसिद्ध केला पाहिजे  !