गडचिरोली येथे सहकाऱ्यावर गोळीबार करून सैनिकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या !
गडचिरोली – राज्य राखीव दलाच्या मरपल्ली पोलीस साहाय्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या एका सैनिकाने दुसऱ्या सैनिकावर गोळी झाडून नंतर स्वत:ही आत्महत्या केली. ही घटना १ जून या दिवशी येथे घडली. श्रीकांत बेरड (वय ३५ वर्षे) आणि बंडू नवथर (वय ३३ वर्षे) अशी मृत सैनिकांची नावे आहेत.
घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या अन्य सैनिकांनी ‘श्रीकांत आपल्यालाही मारेल’, या भीतीने खोलीतून पळ काढला. गोळी झाडण्यामागील कारण समजू शकले नाही.