ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत ३८ अनधिकृत शाळा !
ठाणे, २ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील ग्रामीण भागांत ३८ अनधिकृत शाळा चालवल्या जात आहेत, ही माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली. यामध्ये सर्वाधिक शाळा या कल्याण तालुक्यातील आहेत. या शाळांच्या संस्थाचालकांनी अनधिकृत शाळा आणि वर्ग तात्काळ बंद न केल्यास संबंधित संस्थाचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाइतक्या संख्येत अनधिकृत शाळा उभारल्या जाईपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता ? विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणाऱ्या संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित ! |