… तर पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल ! – उपमुख्यमंत्री
मुंबई – कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे काळजीचे कारण आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर राज्यात पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ जून या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.
या वेळी खासदारकीच्या निवडणुकीविषयी अजित पवार म्हणाले, ‘‘भाजपचे २, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येईल. सहाव्या उमेदवारासाठी आमची मते शिवसेनेलाच देणार आहोत. राज्यसभेचे मतदान दाखवून केले जाते. त्यामुळे घोडेबाजार होणार नाही. अपक्ष मतदान दाखवून केले जात नाही. त्यामुळे त्यामध्ये घोडेबाजार होण्याची चर्चा चालू आहे. नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची अनुमती मिळावी, यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत.’’