मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराने पर्यवेक्षकाला बुटांनी केली मारहाण
सरकारी टाकी बांधतांना साहित्याची गुणवत्ता चांगली नसल्याने राग अनावर !
झाबुआ (मध्यप्रदेश) – जिल्ह्यातील थांदला येथील काँग्रेसचे आमदार वीरसिंह भुरिया यांनी एका पर्यवेक्षकाला बुटांनी मारहाण केली. सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओतून ही घटना समोर आली. नळ जल योजनेच्या अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या टाकीच्या कामाची पहाणी करण्यासाठी भुरिया गेले होते. त्या वेळी टाकी बनवतांना वापरण्यात येत असलेल्या साहित्याची गुणवत्ता पाहून ते संतापले आणि रागाच्या भरात त्यांनी पर्यवेक्षकाला मारहाण करण्यास आरंभ केला.
कांग्रेस विधायक का एक व्यक्ति को जूते से पीटने का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. #Congress #MadhyaPradesh #VeerSinghBhuriahttps://t.co/DUuc3AYqhJ
— ABP News (@ABPNews) June 2, 2022
आमदार भुरिया यांच्यासंदर्भात यापूर्वीही असे प्रसंग समोर आले होते. राज्यात काँग्रेस सरकारच्या काळात दुचाकीवर तीन जण बसलेले पाहून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दंड आकारला होता. त्यानंतर आमदार भरात यांनी पोलीस अधिकार्याचे स्थानांतर करण्याची धमकी दिली होती.
संपादकीय भूमिका‘लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत’, हे विसरणार्या काँग्रेसच्या आमदाराचा निषेध ! काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर कारवाई करतील का ? तसेच पर्यवेक्षकाने सरकारी कामात कुचराई करणे, हेसुद्धा गंभीर आहे. अशांवर कारवाई व्हायला हवी ! |