काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार सोडवला पाहिजे ! – तुर्कस्तानचे राष्ट्रपती एर्दोगन यांचे फुकाचे बोल

डावीकडून पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोगन

अंकारा (तुर्कस्तान) – अनेक दशकांहून जुना असलेला काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुरूप सोडवला पाहिजे, असे विधान तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोगन यांनी केले. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तुर्कस्तानच्या दौर्‍यावर आहेत. या दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एर्दोगन यांनी वरील विधान केले.

सौजन्य स्टेटक्राफ्ट

राष्ट्रपती एर्दोगन म्हणाले की, तुर्कस्तान प्रत्येक प्रकारच्या आतंकवादाच्या विरोधात आहे. पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात जी लढाई लढत आहे त्यात त्याचा विजय होईल, असा मला विश्‍वास आहे.

(म्हणे) ‘भारताच्या कारवायांमुळे क्षेत्रीय शांतता आणि स्थिरता यांना धोका !’ – पाकचे पंतप्रधान

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा !

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणले की, भारताच्या कारवायांमुळे क्षेत्रीय शांतता आणि स्थिरता यांना धोका निर्माण झाला आहे. मी एर्दोगन यांना याविषयीची माहिती दिली आहे. पाक नेहमीच शांतीच्या दिशेने काम करत राहील. काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार सोडवल्यास दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता निर्माण केली जाऊ शकते.

संपादकीय भूमिका

काश्मीरचा प्रश्‍न हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. तो कसा आणि कुणी सोडवावा, हे सांगण्याचा प्रयत्न एर्दोगन यांनी करू नये, अशी समज भारताने त्यांना दिली पाहिजे !