जळगाव येथील जैन हिल्स येथे शेतीविषयीच्या ८ व्या संमेलनास प्रारंभ !

५ जूनपर्यंत संमेलनाचे आयोजन

जळगाव – शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योग यांची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने गत ७ वर्षांपासून जैन हिल्स येथे संमेलन आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र आणि गुजरात येथील १३५ शाळांतील ११ सहस्र विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या ८०० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या ८ व्या संमेलनाला १ जूनपासून प्रारंभ करण्यात आला. हे संमेलन ५ जूनपर्यंत जैन हिल्स येथे असेल.

१. शाळाशाळांमधून ‘फाली’च्या (future Agriculture Leaders of India – FALI) माध्यमातून २५ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकवण्यात येते.

२. फालीचे अध्यक्ष आणि गोदरजे ग्रुपचे नादीर गोदरेज, यूपीएल्चे रजनीकांत श्रॉफ, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल जैन उपाध्यक्ष, असोसिएशन फॉर फालीचे उपाध्यक्ष नॅन्सी बेरी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या संमेलनाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक कृषी उद्योजक यशस्वी झालेले आहेत, हे संमेलनाचे फलित म्हणता येईल. अशा ६ यशस्वींचे अनुभवकथन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.

३. संमेलनात सहभागी होणारे विद्यार्थी शेतीविषयीच्या ज्ञानाचा वापर शेतीसाठी करत आहेत. कौटुंबिक शेतीत आधुनिक शेतीपद्धत वापरण्यास प्रारंभ केल्याने उत्पादनात वाढ झाली आणि पर्यायाने कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. संमेलनामुळे कृषीव्यवसायाचा समृद्ध मार्ग मिळाला आहे.