भारताकडून पाठवण्यात आलेला गहू तुर्कस्तानने नाकारला !
गव्हामध्ये रोग असल्याचा दावा
अंकारा (तुर्कस्तान) – तुर्कस्तानने भारताकडून निर्यात करण्यात आलेली गव्हाची १ कोटी ५० लाख टन खेप घेण्यास नकार दिला आहे. तुर्कस्तानने यासाठी या गव्हामध्ये ‘रूबेला’ नावाचा रोग असल्याची तक्रार केली आहे. हा गहू परत येत असल्याने भारतीय व्यापार्यांना अडचण निर्माण झाली आहे. भारताने एप्रिल मासातच देशातून गहू निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. त्यापूर्वी हा गहू पाठवण्यात आला होता.
संपादकीय भूमिकातुर्कस्तानची भारतविरोधी मानसिकता पहाता भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त करण्यासाठीच तुर्कस्तानने भारताला गहू परत केला आहे ! भारतानेही यापुढे अशांना गहू न पाठवून धडा शिकवला पाहिजे ! |