सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांना केलेले प्रेरणादायी आणि अनमोल मार्गदर्शन !
‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी गुढीपाडवा शुभेच्छा पत्र, सनातन संस्कार वही आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ (खंड ५)’ यांची मागणी घेण्याच्या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र अन् गोवा राज्य येथील सत्संगात येणारे साधक, कृतीशील वाचक, धर्मप्रेमी, जिज्ञासू आणि साधकांचे नातेवाईक यांना मार्गदर्शन केले. तेव्हा सद्गुरु स्वातीताईंनी शुभेच्छापत्राविषयी भावार्चना घेतली. त्यानंतर साधकांकडून जिल्ह्यात उत्साहाने प्रयत्न होऊ लागले. या मार्गदर्शनानंतर सद्गुरु स्वातीताईंनी उत्तर भारत, मध्यप्रदेश, गुजरात, मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांसाठीही पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले.
१. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) कार्य व्यापक स्तरावर चालू आहे. आपणही आता व्यापक स्तरावर कार्य करायला हवे. आपल्याला आपल्या चौकटीच्या (‘मी, माझे’ या संकुचित विचाराच्या चौकटीच्या) बाहेर येऊन कार्य करायचे आहे.
२. या घोर आपत्काळातही गुरुदेव समाजाचा उद्धार करण्याचा विचार करत आहेत. आपल्याला केवळ सकारात्मक राहून त्यांचे माध्यम होऊन समाजात जायचे आहे. गुरुदेवांचे हे निर्गुण रूप आपल्याला समाजाशी जोडणार आहे.
३. हिंदूंना कुठेही धर्मशिक्षण मिळत नाही. ‘समाजाला धर्मशिक्षण मिळावे’, यासाठी गुरुदेवांनी या शुभेच्छापत्रांची निर्मिती केली आहे. आपल्याला हे धर्मशिक्षण घराघरांत पोचवायचे आहे.
४. ज्या हिंदूंना मरगळ आली आहे, त्यांची जागृती करण्यासाठी आपल्याला हे शुभेच्छापत्र सगळ्यांपर्यंत पोचवायचे आहे. त्यासाठी आपल्याला ध्येय ठेवून प्रयत्न करायचे आहेत.
५. गुढीपाडवा शुभेच्छापत्राच्या माध्यमातून आता साक्षात् श्री महाविष्णुस्वरूप गुरुदेव घराघरात जाणार आहेत. त्यामुळे घराघरांत हे धर्मतेज आणि ब्राह्मतेज पसरणार आहे.
६. सकारात्मक विचार करून कृती केल्याने तो विचारच आपल्याला गुरुदेवांकडे घेऊन जाणार आहे.
७. गुरुदेवांनी आपल्याला आपल्या उद्धारासाठी ही मोक्षदायी सेवा दिली आहे. ही सेवाच आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार आहे.
८. ‘मी मागणी कुठे सांगणार आहे ? माझ्या हृदयातून श्रीकृष्णच मागणी सांगणार आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न करायला हवेत. सर्व साधकांनी मिळून ध्येय ठेवून प्रयत्न करायला हवेत.
भारतात येण्या हिंदु राष्ट्र ।
पोचवा घराघरांत गुढीपाडव्याचे शुभेच्छापत्र ।
धर्मतेज पसरता साऱ्या समाजात ।
ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा प्रकाश पसरेल भारतात ।
अन् सर्व जण अनुभवतील हिंदु राष्ट्र ।।
– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (३०.१.२०२२)
सद्गुरु स्वाती खाडये यांची प्रेरणादायी सुवचने !१. ‘कुठल्याही मोहिमांचे नियोजन करतांना सद्गुरु स्वातीताई मला नेहमी सांगतात, ‘आपल्याला खारूताईचा नाही, तर मोठे ध्येय ठेवून हनुमंताचा वाटा उचलायचा आहे. आपल्याला या हिंदु राष्ट्राच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलायचा आहे.’ २. ‘कोणाला काय आवडेल ?’, या विचारापेक्षा ‘गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) काय आवडेल ?’, यासाठी प्रयत्न केले, तर साधकांची शीघ्र गतीने साधना होईल.’ – (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (३०.१.२०२२) |