सहस्रो प्रकरणे प्रलंबित ठेवणे प्रशासनाला लज्जास्पद !
‘दक्षिण गोव्यातील सासष्टी, मुरगाव, केपे, सांगे, काणकोण, धारबांदोडा आणि फोंडा या ७ तालुक्यांमध्ये मुंडकार, कुळ आणि अन्य प्रकरणे यासंबंधी एकूण ६ सहस्र ११८ प्रकरणे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. महसूलमंत्री मोन्सेरात यांनी सहा मासांत प्रलंबित महसूल प्रकरणे निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे.’