मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते श्रीराममंदिराच्या गर्भगृहाचा शिलान्यास
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या भव्य श्रीराममंदिराच्या गर्भगृहाचा शिलान्यास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते १ जून या दिवशी सकाळी करण्यात आला. या वेळी स्वामी परमानंद यांच्यासह श्रीराममंदिर आंदोलनाशी संबंधित १०० हून अधिक संत उपस्थित होते. या भूमीपूजनासह मंदिराच्या बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुतऱ्याचे बांधकाम करण्यात आले. या गाभाऱ्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे, तसेच वर्ष २०२४ मधील मकरसंक्रातीला प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठापना होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने बुधवार को राम मंदिर के पवित्र गर्भगृह का शिलापूजन किया। #RamTemplehttps://t.co/2ziIkYoFtp
— India TV Hindi (@IndiaTVHindi) June 1, 2022
भगवान वाल्मीकि, माता शबरी आणि जटायू यांची मंदिरेही बांधण्यात येणार
श्रीराममंदिरासह या परिसरात भगवान वाल्मीकि, माता शबरी, जटायू, माता सीता, विघ्नेश्वर (गणेश) आणि शेषावतार (लक्ष्मण) यांची मंदिरे बांधण्याची योजना आहे. हे बांधकाम एकूण ७० एकर परिसरात आणि उद्यानाबाहेरील मंदिराच्या परिसरात केले जाणार आहे.