ज्ञानवापी मशिदीतील व्हिडिओ पाहून तेथे शिवलिंग असल्याचे वाटते ! – अभिनेते अक्षय कुमार
मुंबई – ज्ञानवापी मशिदीतील प्रसारित झालेल्या सर्वेक्षणाच्या व्हिडिओसंदर्भात अभिनेते अक्षय कुमार यांनी एका वृत्तपत्राकडे त्यांचे मत मांडले. ते म्हणाले, जो व्हिडिओ उघड झाला आहे, त्यासंदर्भात सरकार, पुरातत्व खाते, सर्वेक्षण विभाग आणि न्यायाधीश योग्य ते मत मांडू शकतील. ज्या गोष्टींची माझ्याकडे माहिती नसते, त्यासंदर्भात बोलणे मी नेहमीच टाळतो. मी हा व्हिडिओ पाहिला आहे. आपल्याला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फारसे समजणार नाही; पण व्हिडिओ पाहिला की, ‘तेथे शिवलिंग आहे’, असे दिसते.
#AkshaySeSawalPublicKa: ‘देखने में तो शिवलिंग ही लगते हैं’ देखिए, ज्ञानवापी के नए वीडियो पर और क्या बोले #Bollywood एक्टर अक्षय कुमार@navikakumar के सवाल, @akshaykumar के जवाब#SamratPrithviraj #SawalPublicKa #Gyanvapi #Varanasi #GyanvapiTapes pic.twitter.com/cuECYYLX5W
— Times Now Navbharat (@TNNavbharat) May 31, 2022
ज्ञानवापी प्रकरणी वाराणसीतील न्यायालयाच्या आदेशानुसार श्री काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. या सर्वेक्षणाच्या वेळी बनवलेले व्हिडिओ ३० मे या दिवशी हिंदु आणि मुसलमान पक्षकारांकडे सोपवण्यात आले. यांमधील काही व्हिडिओ उघड (लीक) झाल्याचा आरोप हिंदु पक्षकारांनी केला आहे. या व्हिडिओमध्ये शिवलिंग, त्रिशूळ आदी चिन्हे दिसत आहेत.