मुंबईतील २६९ अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे पालिकेकडून आवाहन !
मुंबई – मुंबईमध्ये २६९ शाळा अनधिकृत असून पालकांनी तेथे मुलांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. या अनधिकृत शाळांची सूची महापालिकेने संकेतस्थळावर ठेवली आहे. अनधिकृत शाळांवर बंदी घालण्यासह त्यांच्याकडून आर्थिक दंडही आकारण्यात येणार आहे, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. शाळांची सूची शासनाकडे पाठवली असून त्यानुसार दंडाची कारवाई करण्यात येईल.
मागील वर्षी २८३ अनधिकृत शाळांची सूची प्रसिद्ध करण्यात आली होती. यांपैकी ४ शाळांना राज्यशासनाद्वारे ‘स्वयंअर्थसाहाय्यित’ तत्त्वावर अनुमती देण्यात आली आहे. ४ शाळांना ‘राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान’ यांची मान्यता प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षीच्या सूचीतील ११ शाळा बंद झालेल्या आहेत. यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुधारित यादीमधून १९ शाळांना वगळण्यात आले आहे, तसेच या वर्षाच्या सूचीमध्ये नव्याने आढळून आलेल्या ५ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार २६९ शाळा अनधिकृत असल्याचे महापालिकेने घोषित केले आहे.
संपादकीय भूमिका
|