दूषित पाण्याविषयी प्रतिदिन ३०-४० महिलांच्या तक्रारी !
जळगाव येथे दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर !
जळगावकरांचे दूषित पाण्यावरून आंदोलन !‘अमृत योजने’मुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी गटारी फुटून त्यांचे पाणी घरापर्यंत येत आहे. दूषित पाण्यामुळे अनेकांना पोटदुखीचा त्रास होत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. या वेळी घोषणाही देण्यात आल्या. महासभा चालू असल्याने आयुक्त निवेदन स्वीकारण्यास न आल्याने आंदोलकांनी पालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. |
जळगाव – येथे पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा होत आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढत आहेत. प्रतिदिन ३० ते ४० महिला या तक्रारी घेऊन येत असल्याचे नगरसेवकांनी मनपा महासभेत मांडले, तसेच ठरलेल्या वेळेत पाणीपुरवठा होत नसून त्यातही दिरंगाई होत आहे. एकंदरीत याविषयी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|