महिलेच्या घरी जाऊन बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पुणे येथील मांत्रिकाला अटक !
पुणे – धनंजय गोहाड उपाख्य नाना या मांत्रिकाने महिलेचा विनयभंग करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली असून त्याची शिष्या सुरेखा जमदाडे ही पसार आहे. पीडित ३६ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंत्रिकासह त्याला साहाय्य करणाऱ्या महिला शिष्येच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा, विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न, अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिका
|