प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील रुद्रप्रयाग विद्या मंदिरात भारतीय संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांवर बिंबवण्याच्या दृष्टीने ऑनलाईन अभ्यासक्रमाला प्रारंभ
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा उपक्रम
वाराणसी – येथील रुद्रप्रयाग विद्या मंदिराचे मुख्य व्यवस्थापक श्री. सत्येंद्र द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थ्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून भारतीय संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांवर बिंबवण्याच्या दृष्टीने ऑनलाईन अभ्यासक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यात हिंदु संस्कृतीनुसार नामजप करण्याने मनाची एकाग्रता वाढून शिक्षणात त्याचा लाभ कसा होतो, याची माहिती देण्यात आली. ही माहिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. सानिका सिंह यांनी उपस्थितांना दिली. या वेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी कौतुक केले अन् अशा प्रकारचा वर्ग प्रतिदिन घेण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.