पाकमध्ये प्रतिवर्ष १ सहस्र १०० महिलांचे होते ‘ऑनर किलिंग’ !
(टीप : ‘ऑनर किलिंग’ म्हणजे कुटुंबाची अब्रू घालवल्याचा आरोप करत केलेली हत्या)
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानात मुलींचे विवाह बलपूर्वक लावले जात असल्याने तेथे ‘ऑनर किलिंग’चे प्रमाणही वाढले आहे. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२१ मध्ये अशा ४५० हून अधिक घटनांची नोंद झाली आहे. वर्ष २००४ ते २०१६ या काळात १५ सहस्र २२२ हत्या झाल्या आहेत, म्हणजेच प्रतिवर्षी १ सहस्र १७०, तर प्रत्येक आठवड्याला २२ हत्या होत आहेत. ही आकडेवारी जगातील सर्वोच्च आहे.
पाकिस्तान में सिर्फ आर्थिक और राजनीतिक संकट ही नहीं, बल्कि मानवीय संकट से भी परेशान हैं #Pakistan https://t.co/Ggh8cynZQe
— Zee News (@ZeeNews) May 31, 2022
. वर्ष २०१६ मध्ये प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचच्या हत्येनंतर ‘ऑनर किलिंग’च्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार ‘ऑनर किलिंग’च्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे; मात्र त्यात करण्यात आलेल्या सुधारणांमुळे हा कायदा कमकुवत झाला आहे.
२. हत्येच्या प्रकरणात पंचायतींची भूमिका असते. एका स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा ताहिरा गुल म्हणाल्या की, काही प्रकरणांमध्ये स्थानिक पंचायत पद्धती महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रोत्साहन देते. जून २०२२ मध्ये पाकिस्तानच्या दक्षिण पंजाब जिल्ह्यातील मुझफ्फरगडच्या स्थानिक पंचायतीने एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्याचा आदेश दिला होता.