भाकड गायींना वार्यावर सोडून देणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद होणार !
उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ शासनाचा निर्णय
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ज्या गायी दूध देणे बंद करतात, अशांना त्यांचे मालक असलेले शेतकरी वार्यावर सोडून देतात. अशा शेतकर्यांच्या विरोधात उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ शासन गुन्हा नोंद करणार आहे. अशा शेतकर्यांच्या विरोधात ‘पशू क्रूरता प्रतिबंध अधिनियमा’च्या अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे पशुपालन मंत्री धर्मपाल सिंह यांनी दिली.
The Uttar Pradesh government on Monday said FIRs under the Prevention of Cruelty to Animals Act will be registered against farmers who abandon their unproductive cattle.https://t.co/hAprUAtMSP
— News18.com (@news18dotcom) May 30, 2022
विधानसभेत सिंह म्हणाले की, राज्यातील १ लाख असाहाय्य पशूंसाठी १०० दिवसांत ५० सहस्र आश्रयघरे निर्माण केली जाणार आहेत. पुढील ६ मासांमध्ये एक लाख आश्रयघरे बांधण्याचे राज्यशासनाचे नियोजन आहे. भाकड गायींच्या शेणापासून बायोगॅस बनवण्याचे आमचे नियोजन आहे. पंतप्रधान मोदी यांनी याआधीच शेतकर्यांना उद्देशून म्हटले होते की, जेव्हा त्यांच्या गायी दूध देणे बंद करतील, तेव्हा त्यांच्या शेणाद्वारेही उत्पन्न मिळू शकते.
संपादकीय भूमिकागोमातेच्या रक्षणासाठी अशी कठोर भूमिका घेणार्या योगी आदित्यनाथ शासनाचे अभिनंदन ! अन्य भाजपशासित सरकारांनीही असा निर्णय घेणे अपेक्षित आहे ! |