संभाजीनगर येथे वडिलांकडून पोटच्या मुलीवर ११ वर्षे अत्याचार !

वडिलांना अटक !

संभाजीनगर – जिल्ह्यातील गारखेडा येथील एका मनोविकृत वडिलांनीच स्वत:च्या मुलीवर ११ वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजाणतेपणाच्या वयात चालू झालेला अत्याचार वय वाढल्यानंतरही अल्प होत नसल्याचे लक्षात आल्यावर तिने घरच सोडण्याचा निर्णय घेतला. ती पळून गेल्यानंतर अल्पवयीन असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करून तिचा शोध घेतला; मात्र चौकशीत तिने ११ वर्षे केलेल्या अत्याचाराची घटना सांगितल्यानंतर पोलीसही स्तब्ध झाले. पुंडलिकनगर पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी तात्काळ

वर्ष २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या वडिलांवर गुन्हा नोंद झाला होता. (याच वेळी त्यांना कठोर शिक्षा केली असती, तर पुढील अत्याचार थांबले असते ! – संपादक) त्या गुन्ह्यात वडील जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी मुलीवर अत्याचार करणे चालूच ठेवले. ते खासगी वाहनावर चालक आहेत, तर आई मजुरी करते. पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी वडिलांवर
बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

नैतिकतेला काळीमा फासून वासनांनी पछाडलेल्या अशा लोकांना कठोर शिक्षाच हवी !