युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी पोलंडला जागतिक निधीचे केंद्र बनण्याची इच्छा !
वॉर्सा (पोलंड) – रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे मोडकळीस आलेल्या युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी पोलंड जागतिक निधीचे केंद्र बनावे, असे वक्तव्य पोलंडचे उपपंतप्रधान जेसेक सॅसिन यांनी केले. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून पलायन केलेल्या शरणार्थींपैकी तब्बल ३७ लाख शरणार्थींना एकट्या पोलंडने आश्रय दिला आहे. यासह पोलंडने युक्रेनला शस्त्रास्त्रे देऊन साहाय्य केले आहे. रशियाने युक्रेनचे सर्व समुद्री मार्ग बंद केल्याने युक्रेनचा धान्याचा व्यापार पोलीश मार्गाद्वारेच विविध देशांना होत आहे, असेही सॅसिन म्हणाले.