‘जे.एन्.यू.’तील विद्यार्थिनीचा साम्यवादी विद्यार्थ्याकडून विनयभंग

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (‘जे.एन्.यू.’च्या) तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्याच वर्गातील प्रसन्न राज नावाच्या साम्यवादी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्याने तिचा विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी राजच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याची माहिती ट्वीट करून दिली. प्रसन्न राज हा ‘ऑल इंडिया स्टुडेंट्स असोसिएशन’ या साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा सदस्य असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला आहे. ‘या साम्यवादी संघटनेवर लैंगिक अत्याचारांच्या एवढ्या तक्रारी झाल्या आहेत की, या संघटनेचे नाव पालटून ते ‘ऑल इंडिया सेक्शुअल असॉल्टर्स’ असे केले, तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही’, असे अभाविपने म्हटले.

पीडितेने म्हटले आहे की, आरोपीने तिला अपकीर्त करण्याचाही प्रयत्न केला होता.

संपादकीय भूमिका

या आरोपांमध्ये जर तथ्य असेल, तर साम्यवादी विद्यार्थ्याला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. साम्यवादी इतर वेळी स्त्रीमुक्ती आणि स्त्रियांचे हक्क यांविषयी गप्पा मारतात; मात्र ‘त्यांचे कार्यकर्ते स्त्रियांचे कसे शोषण करतात ?’, हेच यातून दिसून येते !