(म्हणे), ‘धर्माची गोळी दिली की, लोक झोपून रहातात हे त्यांना ठाऊक आहे !’ – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस
कोल्हापूर, ३० मे (वार्ता.) – अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्येक सूत्रावर ओढून-ताणून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, याचे कारण म्हणजे धर्मांध शक्तींना रोखणारे शरद पवार हेच एक हिमालय आहे. महात्मा गांधी यांना ज्याप्रमाणे अपकीर्त केले जात आहे, तसाच प्रयत्न शरद पवार यांच्याविषयी होत आहे. महाराष्ट्रात वणवा पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्माची गोळी दिली, तर लोक झोपून रहातात, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांना गोळी देऊन झोपवले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना केला. (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आजपर्यंत केवळ धर्म-जात यांच्या आधारावरच राजकारण केले. नेहमीच अल्पसंख्याकांना चुचकारण्याचे काम केले. आता हिंदू जागृत होत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पितळ उघडे पडत असल्याने जितेंद्र आव्हाड सारख्यांना पोटशूळ होऊन ते अशी वक्तव्ये करत आहेत, हे जनता ओळखून आहे ! – संपादक)
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, ‘‘एका निरपराध मुलाला डांबून ठेवणे ही व्यवस्था चुकीची आहे. याचा बालमनावर काय परिणाम होत असेल, याचाही सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. तो केवळ शाहरूख खानचा मुलगा आहे हे कारवाईचे कारण होऊ शकत नाही.’’ (आजपर्यंत अनेक निरपराध हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनाही विविध खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली, डांबून ठेवण्यात आले. त्यावर कधी जितेंद्र आव्हाडांनी भाष्य केल्याचे ऐकिवात नाही ! केवळ अल्पसंख्याकांच्या विषयीच जितेंद्र आव्हाडांना पुळका का ? – संपादक)