संभाजीनगर येथे विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर नातेवाइकांची रुग्णालयात हाणामारी !
संभाजीनगर – येथील गर्भवती महिला सौ. जयश्री हिने २८ मे या दिवशी पहाटे रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक रुग्णालयात आले. या वेळी सासर आणि माहेर यांच्या नातेवाइकांत हाणामारी झाली. या प्रसंगी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणी एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अकस्मात् मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयश्री यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. (प्रतिकूल परिस्थितीत संयम राखून परिस्थिती स्वीकारण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे ! – संपादक)