लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘टीलेवाली मस्जिद’ हिंदूंचे पूर्वीचे मंदिर !

लक्ष्मणपुरी येथील सत्र न्यायालयात याचिका

पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील टीलेवाली मस्जिद हे ‘लक्ष्मण टीला’ आहे. त्यामुळे ते हिंदूंकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सत्र न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर ३० जुलैला सुनावणी होणार आहे.

वर्ष २०१३ मध्ये कनिष्ठ न्यायालयात या संदर्भात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ती फेटाळण्यात आल्यानंतर त्याला आव्हान देण्यासाठी सत्र न्यायालयात ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी सांगितले की, टीलेवाली मशिदीचा पूर्ण परिसर शेषनागेस्थ टीलेश्‍वर महादेवाचे स्थान आहे. ते औरंगजेबाच्या काळात पाडण्यात आले होते.