ऑस्ट्रेलियाने स्वस्तिकला द्वेषपूर्ण प्रतिकांच्या सूचीतून वगळले !
हिंदूंच्या विरोधाचा परिणाम !
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्याचे प्रशासन समाजात द्वेषाचा प्रसार रोखण्यासाठी कायदा बनवण्याच्या सिद्धतेत आहे. या कायद्याद्वारे काही प्रतिकांवरही बंदी घालण्यात येणार आहे. हिटलरच्या नाझी विचारसरणीशी संबंधित काही चिन्हांवर आणि चित्रांवर बंदी येणार आहे. त्यात हिंदूंचे धार्मिक चिन्ह ‘स्वस्तिक’ला नाझीचे चिन्ह ठरवून त्यावर बंदी घालण्याच्या प्रयत्नामुळे त्याला हिंदूंनी विरोध केला. त्यानंतर चिन्हांच्या सूचीतून स्वस्तिकला वगळण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाविदेशातील हिंदूंकडून भारतातील हिंदूंनी शिकावे ! |