राणा दांपत्यासह १४ जणांवर गुन्हा नोंद !

रवि राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा

अमरावती – रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक लावल्याप्रकरणी आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांसह १४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राणा दांपत्य देहलीवरून अमरावती येथे त्यांच्या निवासस्थानी परतले असतांना त्यांचे स्वागत करतांना त्यांच्या समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावली.  या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वाती पवार यांच्या तक्रारीवरून राणा आणि त्यांचे समर्थक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.