‘सिलिका सायंटिफिक’ आस्थापनाला आग !
ठाणे, २९ मे (वार्ता.) – येथील अंबिकानगर भागात असलेल्या ‘सिलिका सायंटिफिक’ या प्रयोगशाळेतील साहित्य बनवणार्या आस्थापनामध्ये २९ मेच्या रात्री १० वाजता आग लागली. अर्ध्या घंट्यामध्ये तेथे ५ स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्नीशमनदलाचे सैनिक आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी घटनास्थळी जाऊन रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी झाली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.