हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना आणि धर्मसेवा करण्याचा सर्व धर्माभिमान्यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कृष्णानगरमध्ये ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्याचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी हिंदु राष्ट्र, हिंदूंचे संघटन, साधना, वक्तृत्व विकास आणि माहिती अधिकाराचे प्रशिक्षण आदी महत्त्वाच्या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये लक्ष्मणपुरी आणि रायबरेली जिल्ह्यातील अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.

क्षणचित्रे

१. लक्ष्मणपुरी येथील धर्मप्रेमी श्री. भूपेंद्र प्रजापती यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये या कार्यशाळेचे आयोजन केले.

२. कार्यशाळेला उपस्थित रहाण्यासाठी रायबरेली जिल्ह्यातील मिरजहापूर येथील धर्मप्रेमी पहाटे ४ वाजता निघाले होते.

३. लक्ष्मणपुरी येथील धर्मप्रेमी श्री. अमित यादव यांनी कार्यशाळेतील सर्व धर्माभिमान्यांसाठी एक वेळेच्या भोजनाची व्यवस्था केली, तसेच या कार्यशाळेच्या आयोजनाची सर्व व्यवस्था लक्ष्मणपुरी येथील धर्मप्रेमींनी केली.