(म्हणे) ‘हिंदु महासंघाची शपथ, म्हणजे बहिष्कार आणि वर्णवर्चस्ववाद !’ – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस
हिंदु महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतल्याचे प्रकरण
ठाणे – हिंदु महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ‘ज्या दुकानावर भगवे स्टिकर आहे, त्याच दुकानातून वस्तू खरेदी करू’, अशी शपथ घेतली. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘हिंदु महासंघाची ही शपथ, म्हणजे बहिष्कार आणि वर्णवर्चस्ववाद आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘जे कोरोनाची लस घेत आहेत, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे; कारण ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ हे उत्पादन करणार्या आस्थापनाचे मालक हे पारसी अन् मुसलमान आहेत, म्हणजे महासंघाचे कार्यकर्ते आता बहुतेक या लसी यापुढे घेणार नाहीत.’’
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधून जिहाद्यांनी इस्लामच्या बळावर साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना विस्थापित केल्याविषयी, म्हणजेच एकप्रकारे त्यांच्यावर बहिष्कार घातल्याविषयी आव्हाड यांनी जिहाद्यांवर कधी अशी टीका केली आहे का ? |