आज संभाजीनगर येथील ३ वसाहतींतील ८०० अवैध नळजोडण्या तोडणार !
मुख्यमंत्र्यांची ८ जूनला सभा
संभाजीनगर – नियमितपणे पाणीपट्टी भरूनही ८ दिवसांनंतरही पाणी येत नसल्याच्या शेकडो तक्रारी आहेत; मात्र १ रुपयाही न भरता २४ घंटे पाणी वापरणार्या सहस्रो जोडणी आहेत. त्यामुळे पाणीटंचाई होत आहे, असे काही नागरिकांनी वारंवार निदर्शनास आणून दिले. माजी नगरसेवकांनीही त्यासाठी दबाव टाकला. त्याची नोंद घेऊन महापालिकेने ३० मे या दिवशी स्थानिक पोलीस बंदोबस्तात अनुमाने अवैध ८०० नळजोडणी तोडण्यात येणार आहेत. महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे हे पथकाचे प्रमुख असणार आहेत.
१. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून या दिवशी जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी अधिकाधिक वसाहतींचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न होत आहे.
२. पाणीपुरवठ्यासंदर्भात अधिक तक्रारी येत असलेल्या वसाहतींमध्ये महापालिकेच्या विशेष पथकाने मुख्य जलवाहिन्यांची पडताळणी चालू केली आहे. काही व्यावसायिकांनीही अवैधरित्या पाणी घेतले आहे, अशी माहिती पथकप्रमुख वाहुळे यांनी दिली.
३. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात १ लाख ३५ सहस्र अधिकृत नळजोडण्या आहेत; मात्र अवैध नळांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक असण्याचा अंदाज आहे.
४. एका प्रभागात किमान १ ते दीड सहस्र अनधिकृत नळजोडण्या असतील, असे म्हटले जाते. बहुतांश नळजोडण्या मुख्य जलवाहिन्यांवरूनच घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक वेळ या नागरिकांना पाणी मिळत आहे; मात्र शेवटच्या वसाहतीपर्यंत किंवा गल्लीपर्यंत पाणी जात नाही.
संपादकीय भूमिका
|