पास्टर डॉम्निक याच्या घरात सापडलेल्या संशयास्पद साहित्याचे अन्वेषण चालू
(पास्टर म्हणजे पाद्री)
म्हापसा, २८ मे (वार्ता.) – हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करणारा ‘बिलिव्हर्स’चा पास्टर (पाद्री) डॉम्निक याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून झडती घेतली होती. यावेळी पोलिसांनी काही धार्मिक पुस्तके आणि काही संशयास्पद साहित्य कह्यात घेतले आहे. या वेळी ठसेतज्ञांनाही बोलावण्यात आले होते आणि त्यांनीही सर्वत्र पडताळणी करून ठसे मिळवले आहेत. या प्रकरणी अन्वेषण चालू असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली आहे.
म्हापसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक परेश नाईक दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे बोलतांना म्हणाले, ‘‘पास्टर डॉम्निक याला आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला आहे. तक्रारदारांनी यापूर्वी तक्रारीत नमूद केलेल्या कृती उदा. तेल लावण्यासाठी देणे, आदी कृती पुन्हा न करण्याच्या हमीवर न्यायालयाने डॉम्निक याला जामीन संमत केला आहे. ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स चर्च’ येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पास्टर डॉम्निक याच्या विरोधातील तक्रारीला अनुसरून पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.’’ म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाच्या न्यायाधीश रियाना फर्नांडिस यांनी २७ मे या दिवशी पास्टर डॉम्निक याला जामीन संमत करतांना यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती न करणे, प्रकरणाशी निगडित कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी प्रलोभन न दाखवणे, अन्वेषण यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणे, आदी ६ हून अधिक अटी घातल्या आहेत. यामुळे डॉम्निक याला अन्वेषण चालू असेपर्यंत ‘आजारातून बरे होणार’, असे सांगून तेल लावण्यासाठी देणे’ आदी स्वरूपाच्या कोणत्याही कृती आता करता येणार नाही.
२० मे या दिवसाचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ गोळा करणे, पास्टर डॉम्निक याच्या भ्रमणभाषमधील माहिती गोळा करणे आणि या प्रकरणांमध्ये अजून कुणीही गुंतलेले आहेत का ? याचे अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत.
(म्हणे) ‘पास्टर डॉम्निक यांचा रोमन कॅथलिक चर्चशी संबंध नाही; पण समाजात दुफळी माजवणारे त्यांना लक्ष्य करत आहेत !’
रोमन कॅथॉलिक चर्चच्या पाद्र्यांची दुतोंडी भूमिका !
पास्टर डॉम्निक याला पोलिसांनी अटक केल्यानंतर रोमन कॅथॉलिक चर्चच्या अनेक पाद्र्यांनी डॉम्निक याचा रोमन कॅथॉलिक चर्चशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. याविषयी रोमन कॅथॉलिक चर्चचे पाद्री म्हणाले, ‘‘एखाद्या प्रौढ व्यक्तीने रोमन ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्याला मोठ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. यासाठी अनेक मास किंवा वर्षे लागतात. पास्टर डॉम्निक करत असलेल्या कृती रोमन कॅथोलिक चर्चशी संबंधित नाहीत.’’
पाद्री पुढे म्हणाले, ‘‘समाजात दुफळी माजवणारे काही जण पास्टर डॉम्निकला लक्ष्य करू पहात आहे आणि त्यांना समाजात तेढ निर्माण करायचा आहे. सध्या घडत असलेल्या अनेक घटनांमधून हे लक्षात आले आहे. (पास्टर डॉम्निक याच्यावर टीका करणार्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणारे रोमन कॅथॉलिक चर्चचे पाद्री त्याच्यावर कारवाईची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) यापुढे रोमन कॅथॉलिक चर्चच्या पाद्र्यांच्या विरोधातही अशा तक्रारी येऊ शकतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच धर्मांतराच्या विरोधात कठोर विधाने केली आहेत आणि यानंतर पोलिसांनी कोणताही विलंब न लावता धडक कारवाई केली. पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी या प्रकरणाचे सखोल अन्वेषण केले होते का ? एखादा व्यक्ती स्वेच्छेने धर्म पालटू पहात आहे, तर त्याला कुणीही अडवू शकत नाही. धार्मिक नेत्यांच्या विरोधात (पास्टर डॉम्निकच्या विरोधात) धर्माच्या आधारावर प्रथमदर्शनी अहवाल नोंदवून समाजात दुफळी माजवणार्या कृतीवर आमचा तीव्र आक्षेप आहे. प्रथमदर्शनी अहवाल चुकीचा नोंदवल्याचे सिद्ध झाल्यास ज्याने प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला त्याच्यावरच प्रथम कारवाई झाली पाहिजे.’’
संपादकीय भूमिका
|