पास्टर डॉम्निक याला अटक होणे, हा हिंदूंच्या अस्मिता जागृत होत असल्याचा परिपाक ! – कमलेश बांदेकर, भारत स्वाभिमान
हिंदु धर्माचा गोव्यातील वैरी पास्टर डॉम्निक याला अटक करणारे पोलीस आणि राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मी ‘भारत स्वाभिमान’ आणि ‘पतंजलि परिवार’ यांच्या वतीने अभिनंदन करतो. ‘बिलिव्हर्स’ भोळाभाबड्या हिंदूंना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहे. पास्टर डॉम्निक या नराधमाला पुष्कळ आधी अटक करणे आवश्यक होते. याउलट एकगठ्ठा मतांसाठी स्थानिक राजकारण्यांनी त्याच्याकडे मतांसाठी जवळीक केली आणि यामुळे पास्टर डॉम्निक मोकाट सुटला. त्याने सहस्रो हिंदूंच्या पैशांनी आलिशान गाड्या विकत घेतल्या. आज त्याच्यावर चाप बसलेला आहे. गेल्या काही मासांपासून भारतभर हिंदूंच्या अस्मिता जागृत होत असल्याचे अनेक घटनांमधून दिसत आहे. पास्टर डॉम्निक याला पोलिसांनी कह्यात घेणे, हा त्याचाच परिपाक असावा. यापुढे हिंदूनी आपल्या धर्माविषयी अधिक सजग रहाणे आवश्यक आहे आणि धर्माच्या पुनरुत्थानासाठी हिंदूंनी पुढाकार घेतला पाहिजे. हिंदु धर्मावर झालेल्या सर्व अत्याचारांना वाचा फोडून हिंदूंना न्याय मिळेल आणि हिंदु धर्माची पताका पुन्हा एकदा जगभर पसरेल, अशी आशा बाळगतो.