प्रत्येक हिंदू अखंड हिंदु राष्ट्राचा संकल्प करत आहे, याचे संपूर्ण श्रेय प.पू. गुरुजींना ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा
प.पू. आठवले गुरुजी (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले) यांच्या चरणी प्रणाम करतो. त्यांच्या ८० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छितो. प.पू. गुरुदेवांचे दर्शन घेऊन मला १० ते १२ वर्षे झाली. हिंदु जनजागृती समितीच्या तत्त्वविधानात जो अखंड हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प गुरुदेजींनी घेतला आहे, तोच संकल्प आम्ही सर्वजण पुढे नेत आहोत. भारतातील प्रत्येक हिंदू आता अखंड हिंदु राष्ट्राचा संकल्प घेत आहे. त्याचे संपूर्ण श्रेय प.पू. गुरुजींना जाते. प.पू. गुरुजी हेच याचे प्रेरणास्रोत आहेत.
गुरुजी अत्यंत साधे आणि सरळ आहेत. ते प्रत्येकाला आशीर्वाद देतात. प्रत्येक व्यक्तीचे समाधान होईपर्यंत तिच्या प्रश्नांची उत्तरे देतात. हे पाहून पुष्कळ चांगले वाटते. मी अनेकदा कुटुंबियांसहित सनातनच्या आश्रमाला भेट दिली आहे. गुरुजींना भेटल्यावर हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा आणि शक्ती मिळते.