सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरित्र, कार्य आणि विचार
‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, सर्वांगस्पर्शी विपुल ग्रंथसंपदा लिहिणारे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक, मोक्षगुरु इत्यादी वैशिष्ट्यांनी विभूषित असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन
खंड ३ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक कार्य
परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली झालेली रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाची उभारणी, त्यांनी स्थापलेल्या आणि ते प्रेरणास्रोत असलेल्या संस्थांच्या संदर्भातील त्यांचे कार्य वा मार्गदर्शन, त्यांचा ७७ वा वाढदिवस इत्यादी !
खंड ४ : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य
परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून ज्ञान मिळवणे, त्यांचे सूक्ष्म जगताविषयीचे संशोधन कार्य, त्यांचा भुवर्लाेकापासून सातव्या पाताळापर्यंतच्या वाईट शक्तींविरुद्धचा सूक्ष्मातील लढा, त्यांच्या अव्यक्त संकल्पाने आणि अस्तित्वाने होणारे कार्य इत्यादी !
खंड ५ : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन
परात्पर गुरु डॉक्टरांचे अहंशून्यता, प्रीती, द्रष्टेपण इत्यादी व्यष्टी अन् समष्टी गुण, तसेच त्यांची वैशिष्ट्ये, समाजातील संतांची त्यांच्यावरील प्रीती अन् त्यांच्याप्रतीचा भाव, परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात महर्षींच्या आज्ञेनेने साजरे केलेले विविध सोहळे, रामनाथी आश्रमातील चैतन्यदायी स्थाने अन् आश्रमात झालेले बुद्धीअगम्य पालट इत्यादींचे छायाचित्रमय विवेचन !