मंदसौर (मध्यप्रदेश) येथे शिवभक्त मुसलमान व्यक्तीने विधीवत् केली घरवापसी !
मंदसौर (मध्यप्रदेश) – येथे शेख जफर शेख (वय ४६ वर्षे) यांनी इस्लाम सोडून हिंदु धर्म स्वीकारला आहे. आता ते चेतनसिंह राजपूत नावाने ओळखले जाणार आहेत. त्यांची पत्नी हिंदु आहे. त्यांनी येथील पशुपतीनाथ मंदिराच्या परिसरात पुन्हा हिंदु धर्म स्वीकारण्याचा विधी पूर्ण केला. शेख यांना महामंडलेश्वर स्वामी चिदंबरानंद सरस्वती यांच्या हस्ते विधीवत् पूजा करून हिंदु धर्माची दीक्षा देण्यात आली. या वेळी त्यांना शेण आणि गोमूत्र यांद्वारे अंघोळ घालण्यात आली. या वेळी खासदार सुधीर गुप्ता आणि आमदार यशपाल सिंह सिसोदिया यांनीही मंदिरात जाऊन चेतनसिंह राजपूत यांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण प्रक्रियेच्या वेळी आमदार सिसोदिया मंदिरातच उपस्थित होते.
आमदार यशपाल सिंह सिसोदिया म्हणाले की, चेतन राजपूत पहिल्यापासूनच शिवभक्त आहेत. कालपर्यंत ते जफर शेख होता, आता ते ‘चेतन’ या नावाने ओळखले जातील. त्यांनी एक नवा प्रारंभ केला आहे.
मंदसौर में मुस्लिम पत्रकार ने अपनाया हिंदू धर्म, जफर शेख से बने चेतन सिंह राजपूत https://t.co/WFiMOKeFQi
— India TV Hindi (@IndiaTVHindi) May 27, 2022
घरवापसीनंतर चेतनसिंह राजपूत यांची ‘दैनिक भास्कर’च्या प्रतिनिधीने मुलाखत घेतली. त्या राजपूत यांनी मांडलेली सूत्रे –
१. संपूर्ण विश्वातील सर्व लोक सनातनी आहेत. त्यांचे धर्मांतर होऊन ते इकडे-तिकडे स्थलांतरित झाले आहे. त्यांनी धैर्य दाखवावे आणि त्यांच्या मूळ शाश्वत जीवनाकडे परत यावे; कारण येथेच शांती मिळेल.
२. मी लहानपणापासून सनातन धर्माचे पालन करतो. माझ्या घरात देवघर आहे. मला घरातील कुणीही कधी विरोध केला नाही. प्रत्येक जण साधा आणि सरळ आहे. कुणीही कट्टर नाही.
३. मी शारदा नावाच्या हिंदु मुलीशी प्रेमविवाह केला; कारण मी सनातन धर्माचे पालन करतो. जर मी मुसलमान मुलीशी लग्न केले असते, तर तिने मला पूजा करू दिली नसती. अशा परिस्थितीत त्याचा तिला आणि मला दोघांनाही त्रास झाला असता; म्हणूनच मी सर्वकाही विचारपूर्वक केले.
४. देशाच्या घटनेनुसार प्रत्येकाला स्वेच्छेने कोणत्याही धर्मावर श्रद्धा ठेवता येते. यात कुणाला काही अडचण नसावी आणि असेल, तर ती कट्टरता आहे. जे कट्टर आहेत, ते विरोध करतील. जे शहाणे आहेत, ते विरोध करणार नाहीत.
५. कुठेतरी मी स्वतःला अपूर्ण समजत होतो. आज मी पूर्ण झालो आहे. आता धर्मांतर केल्यानंतर मी पूर्ण हिंदु झालो असून परम शिवभक्तही आहे.