भात आणि नागली (नाचणी किंवा रागी) यांची रोपवाटिका (नर्सरी) सिद्ध करतांना घ्यावयाची काळजी
अवघ्या काही दिवसांत मोसमी पावसाला (मृग नक्षत्राला) प्रारंभ होईल. त्यापूर्वी भात आणि नाचणी यांची रोपवाटिका सिद्ध (तयार) करणे आवश्यक आहे. २७ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण भाताची रोपवाटिका सिद्ध करतांना घ्यावयाची काळजी, भाजावळ करण्याची पद्धती, भाजावळीचे तोटे आणि भाजावळमुक्तीसाठी कृषी विद्यापिठाने शिफारस केलेली भात रोपवाटिका याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढच्या अंतिम भागात भाताच्या आणि नाचणीच्या शिफारस केलेल्या जातींची माहिती देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/583065.html
२. भाताच्या शिफारस केलेल्या जाती !
२ अ. हळव्या जाती (कमी कालावधी)
टीप – वरील जातींव्यतिरिक्त कृष्णसाळ, धनसाळ, जिरेसाळ, आंबेमोहोर-१५७, भोगावती आणि बसुमती-३७० या जातींचीसुद्धा लागवड केली जाते. या सर्व जाती सुवासिक आणि मसालेभात अन् पुलाव यांसाठी अतीउत्तम आहेत.
३. नागलीसाठी (नाचणी किंवा रागी) रोपवाटिका !
भूमी आणि गादी वाफे भाताप्रमाणेच सिद्ध करावेत.
शिफारस केलेल्या जाती पुढीलप्रमाणे
टीप – एक हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी १० गुंठे रोपवाटिकेसाठी ५ ते ६ किलो बियाणे वापरावे.
संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रीकल्चर) पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.