सांगलीसाठी नवीन भव्य महापालिका इमारत, तसेच कृषी भवन होणार !
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या पुढाकाराने निर्णय
मुंबई – सांगली महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाची अडीच एकर जागा उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रालयात कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी सांगली जिल्ह्यासाठी डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय अशा इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता महानगरपालिका इमारत होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासकीय कामकाजासाठी सोयीचे होणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या बैठकीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.