धान्याची काळ्या बाजारात विक्री करणारा ट्रक आणि धर्मांध ट्रकचालक कह्यात !
१५ लाख रुपयांचा माल जप्त !
नागपूर – स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. पोलिसांनी ट्रकमधील १५ लाख रुपयांचा तांदूळ आणि गहू जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक जावेद शेख उपाख्य बाबू शेख याला कह्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे देयक अथवा मागणी यांची प्रत नव्हती. त्याने ताजबाग परिसरातून ही धान्याची पोती ट्रकमध्ये भरून ती विक्रीसाठी नेत होता. पोलिसांनी अन्न पुरवठा विभागाला याची माहिती दिली आहे.
स्वस्त धान्य दुकानातील धान्य अल्प भावात खरेदी करून मोठे व्यापारी त्या धान्याची विल्हेवाट लावत आहेत. स्वस्त धान्य दुकानातील धान्याचे ताजबागमध्ये गोदाम असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.
संपादकीय भूमिकाधान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची साखळी आहे का ? याचाही पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईच करायला हवी ! |