परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवाला नमस्कार करणे, सूर्याला अर्घ्य देणे आणि तुळशीला पाणी घालणे या कृतींचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या बाहेर एक आगाशी असून तेथे ‘राम तुळस’ आणि ‘कृष्ण तुळस’ आहेत. तसेच तेथूनच ते देवतांना नमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देण्याची कृती करतात.
१. परात्पर गुरु डॉक्टरांनी तुळशीला पाणी घालण्यापूर्वी तिचे केलेले सूक्ष्म परीक्षण
१ अ. ‘कृष्ण’ तुळस
१. तुळशीच्या पानांवर सूक्ष्मातून पांढऱ्या रंगाचे दैवी कण दिसत होते.
२. तुळशीतून पुष्कळ प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण होत होते.
१ आ. ‘राम’ तुळस
१. तुळशीच्या पानांवर सूक्ष्मातून पांढऱ्या आणि निळ्या रंगांचे दैवी कण दिसत होते.
२. ‘कृष्ण’ तुळशीतील चैतन्य ‘राम’ तुळशीतील चैतन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात जाणवत होते.
१ इ. श्रीरामाच्या तुलनेत श्रीकृष्णाचे कार्य काळानुरूप अधिक असल्याने ‘कृष्ण’ तुळशीतून अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
श्री. राम होनप : ‘कृष्ण’ तुळशीतील चैतन्य ‘राम’ तुळशीतील चैतन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात जाणवले.
परात्पर गुरु डॉक्टर : कृष्णतत्त्वाचे कार्य काळानुरूप अधिक असल्याने असे होते. सूक्ष्मातील प्रयोगांना अंत नाही. आताच्या प्रयोगांत असे जाणवते; पण हिंदु राष्ट्रात राम तत्त्वाचे कार्य अधिक असेल, तेव्हा परत तुळशीचा प्रयोग करायचा.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी तुळशीला पाणी घातल्यावर
२ अ. ‘कृष्ण’ तुळस : तुळशीतील चैतन्य आणखी वाढले आणि ते वातावरणात पसरू लागले.
२ आ. ‘राम’ तुळस : तुळशीतील निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या दैवी लहरी एकत्रित स्वरूपात कार्यरत होऊन वातावरणात पसरू लागल्या.
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०१९)
|